मसूरे प्रतिनिधी: मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा १३ वा वर्धपन दिन सोहळा २६ व २७ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यनिमित्त २६ रोजी सकाळी ८ ते १.३० वा.प्रायश्चित्त, शांतिपाठ, गणेशपूजन, पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, आचार्य वरण, प्राकार शुद्धी, देवता स्थापन, दत्तमालामंत्र जप, ग्रहयज्ञ, लघुपूर्णाहुती, आरती, तीर्थप्रसाद दुपारी १ ते ३ वा.महाप्रसाद, सायं ५.३० वा.श्री स्वामी समर्थ पालखी नगर प्रदक्षिणा, रात्री ७ वा. सुस्वर भजनें. २७ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १ वा. स्थापित देवता, शांतीपाठ, प्राकारशुद्धी, पूजन श्री स्वामी समर्थ दत्तयाग, दुपारी १ ते ३ वा.बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आरती, गा-हाणे, महाप्रसाद सायं ४.०० वा. सत्यनारायण महापूजा, रात्री ७.०० वा. सुस्वर भजने.रात्रौ ८.३० वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना जय बजरंगबली प्रा.भजन मंडळ, मसुरे बुवा श्री. नामदेव गिरकर विरुद्ध श्री पावणादेवी प्रा. भजन मंडळ, तोंडवली बुवा श्री. संतोष मिराशी यांच्यात होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.