Home स्टोरी मसुरे गावच्या नावासाठी माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी ओरोस येथे जनता दरबारात...

मसुरे गावच्या नावासाठी माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी ओरोस येथे जनता दरबारात उठविला आवाज..!

89

पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचे निवेदन देऊन वेधले लक्ष.. 

 

मसुरे प्रतिनिधी: मसुरे डांगमोडे या ग्रामपंचायतीचे नाव मूळ ग्रामपंचायत च्या विभाजनानंतर प्रशासनाच्या चुकीच्या नियमांमुळे बदलून मर्डे असे करण्यात आले आहे. याबाबत येथील ग्रामस्थांची कोणतीही मागणी नसताना प्रशासनाने ग्रामपंचायत चे नाव बदलल्यामुळे मसुरे नावाची अस्मिता पूर्णपणे प्रशासनाने मिटवून टाकली आहे. याबाबत या ग्रामपंचायतीचे नाव पूर्वीप्रमाणे मसुरे डांगमोडे असे करावे अशी मागणी माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी ओरस येथे झालेल्या मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील मंगळवारी झालेल्या लोक दरबारात उपस्थित राहून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांचे या प्रश्नाबाबत लक्ष वेधले आहे. पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्वरित हे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देऊन त्वरित योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले. माजी खासदार निलेश राणे यांनी सुद्धा याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे सांगितले. मसुरे या नावासाठी उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, माजी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांनी सुद्धा वेळोवेळी ग्रामपंचायत ते प्रशासनापर्यंत आवाज उठविला होता. सर्व संबंधितांना वेळोवेळी मसुरे नावासाठी निवेदन दिले होते. मर्डे ग्रामपंचायत च्या वतीने सुद्धा या प्रश्नाबाबत लक्ष वेधले होते. आता पुन्हा एकदा मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी ओरोस येथील जनता दरबारात हजर राहून मसुरे या नावासाठी आग्रही निवेदन प्रशासनास दिले आहे.