Home स्टोरी मळगाव ब्राह्मणपाठ ग्रामीण मार्ग क्रमांक २४७ या रस्त्याचे नूतनीकरण कामाचा शुभारंभ !

मळगाव ब्राह्मणपाठ ग्रामीण मार्ग क्रमांक २४७ या रस्त्याचे नूतनीकरण कामाचा शुभारंभ !

101

सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव ब्राह्मणपाठ ग्रामीण मार्ग क्रमांक २४७ या रस्त्याचे नूतनीकरण कामाचा शुभारंभ आज माळगावच्या सरपंच सौ स्नेहल जामदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी मळगावचे उपसरपंच श्री. हनुमंत पेडणेकर, वार्ड सदस्य सौ. निकिता राऊळ, भाजपा शक्ति केंद्रप्रमुख निळकंठ उर्फ बाळा बुगडे, माजी सरपंच विजयानंद नाईक, बाळ परब, तात्या सामंत, अजित सातार्डेकर, सुरज दयानंद मातोंडकर, शत्रुघ्न मातोंडकर, सुभाष राऊळ, सुधाकर नाईक, राजू नाईक, मोहन राऊळ, रत्नप्रभा नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.गेल्या काही दिवसात माळगाव गावातील अनेक विकास कामांचा शुभारंभ आणि कामांची सुरुवात झाली.