Home स्टोरी मलबार ग्लायडींग फ्रॉगचे फ्रॉगलेट (पिल्लू) १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नैसर्गिक अधिवासात रवाना.

मलबार ग्लायडींग फ्रॉगचे फ्रॉगलेट (पिल्लू) १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नैसर्गिक अधिवासात रवाना.

90

सावंतवाडी प्रतिनिधी: गेल्या नऊ वर्षांपासून मलबार ग्लायडींग फ्रॉगमुळे नावारूपास आलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावातील मंगेश माणगावकर यांच्या बागेमध्ये २८ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी जतन केलेल्या फोमनेस्टमधून शेवटचा फ्रॉगलेट (पिलू) पाण्याबाहेर येऊन १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नैसर्गिक अधिवासात निघून गेले. पावसाळ्याच्या सुरुवातीला फॉमनेस्टमधून तयार झालेली पिल्ले सरासरी दिड महिन्यात पाण्याबाहेर येता, परंतु पावसाच्या शेवटी बांधलेल्या फॉमनेस्टमधून आलेल्या टेडपोल्सच्या वाढीमध्ये वातावरणातील बदल तसेच तापमानातील उतार चढावामुळे फरक जाणवतो व ती पिल्ले विकसित होण्यास जास्त कालावधी लागतो. असे माणगांवकर यांनी नमूद केले. तसेच या टेडपोल्सचे त्यांच्या नैसर्गिक शत्रुंपासून संरक्षण करावे लागते असेही सांगितले.

जैवविविधतेने नटलेल्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवनवीन साजिवांचा शोध लागत असतानाच दुर्मिळ अशा मलबार ग्लायडींग फ्रॉगचे फ्रॉगलेट (पिल्लू) फेब्रुवारी महिन्यात विकसित होणे हि सुद्धा एक दुर्मिळ गोष्ट आहे आणि याची नोंद घेण्यासाठी कुडाळच्या संत राऊळ महाराज कॉलेजचे संशोधक प्रा. डॉ. योगेश कोळी तसेच सावंतवाडी एस.पी.के. कॉलेजचे प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. गणेश मर्गज तसेच अभ्यासकांनी माणगांवकर यांच्या बागेला भेट दिली आहे.