Home राजकारण “मराठा समाजाच्या भावनेशी खेळ खेळू नका पंकजाताई”! माऊली पवार

“मराठा समाजाच्या भावनेशी खेळ खेळू नका पंकजाताई”! माऊली पवार

147

सोलापूर प्रतिनिधी: मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही अशी घोषणा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. या त्यांच्या वक्तव्यावर मराठा समाज बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न आहे. अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष माऊली पवार यांनी श्रीमती मुंडे यांना सवाल केला आहे. आपण कॅबिनेट मंत्री असताना २०१८ साली देण्यात येणाऱ्या आरक्षणाला आपण किती पाठिंबा दिला होता हे मराठा समाज चांगले जाणतो. तुमच्या राजकारणासाठी मराठा तरुणांच्या भावनांशी खेळू नका. २०१६-१७ ला महाराष्ट्र मध्ये लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. त्यावेळेस कोणत्याही मोर्चाला आपण पाठिंबाचे साधे पत्रक देखील काढले नाही.

हे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज चांगलेच जाणतो. (बीड मोर्चा सहित) त्यावेळेसच्या मराठा आरक्षण समितीमध्ये आपणही होता. मराठा आरक्षण देणार म्हटल्यानंतर बैठकीतून आपण निघून गेला होता हा इतिहास आहे. स्वतःची राजकीय वाटचाल अडचणीत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषयाचा फायदा घेऊन मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा खोटा प्रयत्न महाराष्ट्रातील मराठा समाज खपवून घेणार नाही. तुमचे मराठा समाजावर खरोखरच प्रेम असेल तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीला जाहीर पाठिंबा द्या. महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी, माथाडी म्हणून असलेला समाज तुमच्या या मागणीचे जोरदार स्वागत करेल. नाहीतरी हल्ली फेटा आणि तुमचा संपर्क राहिलाच नाही.