Home स्टोरी मराठा महासंघाच्या वतीने प्रथमच वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन

मराठा महासंघाच्या वतीने प्रथमच वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन

69

सावंतवाडी वार्ताहर: मराठा महासंघाच्या वतीने प्रथमच आपण वधू वर सूचक मेळावा आयोजित केलेला आहे. वधु वर मेळावे आजपर्यंत अनेक लोकांनी,खाजगी संस्था असतील यांनी आयोजित केलेले होते. मग या मेळाव्याचं वेगळे वैशिष्ट्य कोणते? गेली १५ वर्ष मराठा समाजाचे काम करीत असताना व वकील क्षेत्रात काम करीत असताना विवाह जुळणे ही सामाजिक समस्या असल्याचे दिसून आले. याला कारणे अनेक आहेत. विवाह संस्था किंवा खाजगी अशा स्वरूपाचे व्यवसाय करणाऱ्यांकडून विवाहाच्या वेळी दिली जाणारी चुकीची माहिती, वधू किंवा वराची आपल्या जोडीदाराबद्दल असणारी अवास्तव अपेक्षा, सामाजिक स्थित्यंतर घरामध्ये त्याची अंमलबजावणीचा अभाव अशी अनेक विथ कारणे या समस्येच्या मुळाशी आहेत. या सर्व कारणांचा सखोल अभ्यास करून मराठा महासंघाच्या वतीने प्रथमतः आम्ही दिनांक १९ फेब्रुवारी शिवरायांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून वधुवर सुचक मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वधू व वराची दिलेली माहिती ही खरी असल्याबाबत खात्री केली जाणार आहे. त्याचबरोबर जे वधू आणि वर यांचे विवाह या मराठा महासंघाच्या वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून जुळले जातील अशांसाठी तज्ञ समूपदेशकाच्या मार्फत विवाहपूर्व समुपदेशन केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जे वधु वर आपली नोंदणी करतील त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या पाल्यांच्या मनामध्ये एक निश्चित भावना निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी देण्यात आलेली माहिती ही जास्तीत जास्त अचूक आणि योग्य असणार. याचबरोबर वधू वर सूचक मंडळाच्या मार्फत वधुनी किंवा वराने आपल्या साथीदाराची निवड करताना नेमक्या कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे याबद्दल सुद्धा या वधू वर मंडळ सुचक कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांचे विवाह जुळतील त्यांच्याशी महासंघाचे एक घरगुती नाते निर्माण होईल. विवाह म्हटल्यानंतर अनेक तडजोडी येतात अनेक संकटे येतात या संकटांमध्ये महासंघ या विवाहित जोडप्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार.जेणेकरून भविष्यात आलेल्या अडचणींचा सामना करण्याचे सामर्थ्य व मराठा वंशवेल पुढे ताकतीने पुढे नेण्याचं सामर्थ त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या विवाह मंडळाच्या मार्फत केला जाणार आहे. अलीकडे असेही लक्षात येते अवास्तव अपेक्षांच्या ओजाखाली विवाह करण्याचे योग्य वेळ तळून गेलेली असते. अशा स्थितीमध्ये नेमका कसा निर्णय घेतला पाहिजे? याबद्दल सुद्धा मार्गदर्शन या कार्यक्रमांमध्ये केले जाणार आहे. मुलींमध्ये अलीकडे बदलत्या राहणीमानामुळे अनेक समस्यांना त्यातून मूल न होणे ही एक गंभीर बाब अलीकडे दिसून आलेली आहे. याबद्दल सुद्धा या विवाह मेळाव्यामध्ये तज्ञांचे मार्गदर्शन आपण ठेवलेले आहे. जेणेकरून भविष्य काळामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या समस्या आपल्या विवाहित जोडप्यांना येऊ नये. ही माफक अपेक्षा आहे.माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण या वधू-वर मेळाव्याची माहिती आपल्या बांधवांपर्यंत जास्तीत जास्त संख्येने पोचवावी व या नवीन उपक्रमास साथ द्यावी ही विनंती.आपला एडवोकेट सुहास सावंत जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग.