Home स्टोरी मनसे सुधीर राऊळ मिञ मंडळाच्या वतीने राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा.

मनसे सुधीर राऊळ मिञ मंडळाच्या वतीने राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा.

103

सावंतवाडी प्रतिनिधी:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस मनसे सुधीर राऊळ मिञ मंडळाकडून सावंतवाडी उपजिल्हा रूग्णाल येथील प्रसुतीगृहातील महीलांना फळे वाटून, उपरलकर देवाला साकडे घालुन आणि शाळेतील लहान मुलांना गोड खाऊ देऊन उत्साहात साजरा करण्यात आला.

राजसाहेब आमचे आधार आहेत. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सगळ्याच पक्षातील नेत्यांनी गढूळ केलं आहे. आता राजसाहेबच हे सगळ वटणीवर आणू शकतात. आम्ही राजसाहेबांची सगळी भाषण बघतो. पुढे मतदान आमचे मनसेलांच असेल. असे गौरउद्दगार रूग्णालयातील महीलांनी काढून राजसाहेबांना शुभेच्छा दिल्या आणि मनसे सैनिकांचे मानले आभार  मानले.

त्यानंतर उपरलकर देवाच दर्शन घेऊन राजसाहेबांना चांगलं दिर्घायुष्य लाभुदे, पुढील वाटचाल सुखकर जाओ,  कुठचाची ञास न होता आनंदात राहोत ही देव उपरलकराकडे मनसे सैनिकांनी साकड घालुन तेथील लोकांना लाडू वाटून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

त्यावेळी जिल्हा सचिव गुरूदास गवंडे, तालुकाअध्यक्ष मिलींद सावंत, विभाग अध्यक्ष राकेश परब, चिन्मय नाडकर्णी, साईल तळकटकर, शतायु जाभळे, विशाल राऊळ, विजय बांदेकर, दिनेश शेर्लेकर उपस्थित होते.