Home क्राईम मणिपूरमध्ये हिंसाचारात आतापर्यंत ५२ हून अधिक लोकांचा मृत्यू

मणिपूरमध्ये हिंसाचारात आतापर्यंत ५२ हून अधिक लोकांचा मृत्यू

77

मणिपूर: मणिपूरमध्ये गेल्या ५ दिवसांपासुन सुरू असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत ५२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती आणखी चिघळताना दिसत असुन या पार्श्वभुमीवर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची कमान लष्कराकडे सोपवण्यात आली आहे. अनेक भागात इंटरनेट बंद करण्यात आले असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ठिकठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह

मणिपूरमध्ये हिसांचाराबाबच बोलताना मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले की, आता चुरचंदपूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. आता कर्फ्यूही शिथिल होणार आहे. तर, मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग म्हणाले की, राज्यात कलम ३५५ लागू करण्यात आलेले नाही. काही अराजक घटक अशा अफवा पसरवत आहेत. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ज्यांच्यावर प्रशासनाला संशय आहे अशा लोकांचाही यात समावेश असेल. दुसरीकडे, जे अडकले आहेत त्यांना वेळेत बाहेर काढले जाईल आणि सुरक्षित स्थळी नेले जाईल. आतापर्यंत सरकार किंवा पोलिसांनी मृतांची आकडेवारी जाहीर केलेली नाही. शुक्रवारी, मणिपूर डीजीपी म्हणाले की सुरक्षेच्या कारणास्तव आकडेवारी जाहीर केली जात नाही.