Home क्राईम मणिपूरमधील ४ मे रोजी महिलांच्या विवस्त्र व्हिडिओमुळे देशभरात संतापाची लाट!

मणिपूरमधील ४ मे रोजी महिलांच्या विवस्त्र व्हिडिओमुळे देशभरात संतापाची लाट!

135

मणिपूर: मणिपूरमधील महिलांच्या कथित विवस्त्र करून आणि विनयभंग केलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा पती कारगिल युद्धातील एक सैनिक असल्याची समोर आली आहे. देशाच्या सैनकाच्या पत्नीबरोबर झालेला हा प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे.

मी कारगिलमध्ये देशाचे रक्षण केले असले तरी आपल्या पत्नीला अपमानित होण्यापासून मला वाचवता आले नसल्याची प्रतिक्रिया या माजी सैनिकाने दिली आहे.

४ मे रोजी शूट झालेला मणिपूरमधील व्हिडियो आता समोर आल्याने दोन दिवस एकच खळबळ माजली आहे. या व्हिडिओमध्ये एका पुरुषांचा गट दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्या महिलांवर बलात्कार केल्याची माहीती समोर आली. या व्हिडिओनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रतिक्रिया मागितली आहे.या दोन महिलांपैकी एक कारगीलच्या युद्धात लढलेल्या माजी सैनिकाची पत्नी असल्याचे समोर आले आहे.

एका हिंदिवृत्तवाहीनीशी बोलताना त्या माजी सैनिकाने म्हटले आहे कि, “मी कारगिल युद्धात देशासाठी लढलो आणि भारतीय शांतता दलाचा भाग म्हणून श्रीलंकेतही सेवा दिली. मी देशाचे रक्षण केले पण माझ्या निवृत्तीनंतर मी माझ्या घराचे, माझ्या पत्नीचे आणि गावकऱ्यांचे संरक्षण करू शकलो नाही. याबद्दल मी खूपच निराश आहे…मी दुःखी आहे…उदास आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. *पिडीत महिलेच्या पतीने भारतीय सैन्यात आसाम रेजिमेंटचे सुभेदार म्हणून देशाची सेवा बजावली होती. पुढे बोलताना ते म्हणाले की, “४ मे रोजी सकाळी जमावाने परिसरातील अनेक घरे जळली. दोन महिलांचे कपडे फाडले आणि त्यांना गावातून फिरवण्यात आले. तिथे पोलीस हजर होते पण त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. ज्या लोकांनी घरे जाळली आणि महिलांचा अपमान केला त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.