Home स्टोरी मडुरा ग्रंथालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा.

मडुरा ग्रंथालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा.

253

 सावंतवाडी प्रतिनिधी:

“माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान “ असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमान देणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून श्रीमती बनुताई पै ग्रंथालय व संस्कार केंद्र, मडुरा येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती मातेच्या फोटो पूजनाने झाली. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. कृष्णा करमळकर सर यांच्या हस्ते कविवर्य कै. कुसुमाग्रज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे तिचे संरक्षण व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. मुलांना मराठी भाषेची ओळख, मराठी साहित्याची जाण, मराठी भाषेशी जवळीक निर्माण करून देण्यासाठी तसेच मुलांमध्ये स्वच्छ व सुवाच्य हस्तलेखनाची आवड निर्माण व्हावी व महत्व कळावे यासाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी सौ कोलते मॅडम यांनी मुलांना मराठी भाषेसंदर्भात मार्गदर्शन केले.

यासोबतच ग्रंथालयात मुलांसाठी ग्रंथ प्रदर्शन ठेवण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.कृष्णा करमळकर, सहकार्यवाह श्री. श्रीकृष्ण भोगले, सदस्य श्री प्रकाश गावडे, सुचिता कोलते, सुवर्णा मडुरकर, ग्रंथपाल मृणाल पंडित,लिपिक स्नेहल सामंत, मनिषा भोगले आदी उपस्थित होते.