Home स्टोरी भेडले माडाचे झाड अंगावर पडल्यामुळे अंजिवडे येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू.

भेडले माडाचे झाड अंगावर पडल्यामुळे अंजिवडे येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू.

542

सावंतवाडी: मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास सावंतवाडी राजवाडा परिसरातील भेडले माडाचे झाड अंगावर पडल्यामुळे अंजिवडे येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांना वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याचा संशय आहे. राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व संभाजी दत्ताराम पंदारे (वय २१) रा. गवळीवाडी अशी या मृत्यू तरुणांची  नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील दोघेही मृत युवक गोठण येथे भजनासाठी आले होते. तेथून दुचाकीने परत जात असताना त्यांच्या अंगावर भेडले माडाचे झाड कोसळले. यात त्या दोघांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती तेथील काही युवकांना कळाली त्यांनी तात्काळ माजी नगराध्यक्ष संजू परब यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ पालिका व पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्या घटनास्थळी पालिकेचा बंब व रुग्णवाहिका दाखल झाली. कटरच्या साह्याने त्या दोघांना बाहेर काढण्यात आले. अपघात झाल्याचे लक्षात येतात त्या ठिकाणी माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव, रॉक्सन डान्टस, बाबा अल्मेडा, डॉ. मुरली चव्हाण, हेमंत पांगम, विनायक गावस, लादु रायका, मोसीन मुल्ला, अॅलेक्स डिसोजा, आशिष रायकर आदींसह सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, आरोग्य निरीक्षक वैभव नाटेकर, नंदू गावकर आदींनी त्या ठिकाणी मदत कार्यात सहभाग घेतला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.