Home स्टोरी भूसंपादन आणि नुकसान भरपाईसंदर्भात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मोहन वाडकर यांचे १५...

भूसंपादन आणि नुकसान भरपाईसंदर्भात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मोहन वाडकर यांचे १५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण तूर्त स्थगित.

178

सावंतवाडी: भूसंपादन आणि नुकसान भरपाईसंदर्भात कळसुलकर शाळेच्या सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीस टी.डी.आर.(Transferable Development Right)देण्यासंबंधी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी लेखी आश्वासन दिले. श्री.साळुंखे यांचे लेखी व तोंडी आश्वासन आणि विनंती चा विचार करुन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मोहन वाडकर यांनी १५ आँगस्ट रोजी पुकारलेले उपोषण तूर्त स्थगित केले आहे.

शहरातील मच्छीमाकेँट मधील सि.टी.सव्हेँ नंबर ५०६८ मधील जागा सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या मालकीची आहे. त्या जागेतून सावंतवाडी नगरपरिषदेने रस्ता काढला. काही कामे केली, परंतु भूसंपादन करण्याचे राहून गेले. संस्थेची शहरातील अत्यंत मोक्याची जागा नगरपरिषदेने घेतली असतांना भूसंपादन करुन नुकसान भरपाई दिली जावी, ही सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीची मागणी आहे. याबाबत नगररचना व मूल्य निर्धारण विभागाचे मागँदशँन घेऊन संस्थेस टि.डी.आर. दिला जाईल, असे लेखी आश्वासन श्री.साळुंखे यांनी संस्थेस दिले. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती श्री.वाडकर यांना केली. पालिका प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन, केलेली विनंती विचारात घेऊन श्री.वाडकर यांनी तूर्त उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष द.म.गोठोसकर यांनी पालिकेचे लेखापाल किरण बटवाल यांच्याशी चर्चा करुन उपोषण तूर्त स्थगित केल्याचे पत्र दिले.