Home स्टोरी भिवंडी येथे लव्ह जिहाद ! हिंदु महिलेची फसवणूक करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा...

भिवंडी येथे लव्ह जिहाद ! हिंदु महिलेची फसवणूक करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

226

ठाणे: राजू उपाख्य सिराज कुरेशी याने पतीपासून अलिप्त रहाणार्‍या २७ वर्षीय हिंदु महिलेशी सामाजिक माध्यमांद्वारे मैत्री करून तिला हिंदु असल्याचे खोटे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या समवेत हिंदु पद्धतीने विवाह करून नंतर तिची फसवणूक केली. या प्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीनंतर त्याच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.लग्नानंतर काही दिवसांनी सिराज कुरेशी याने ‘माझ्या समवेत रहायचे असेल, तर इस्लाम धर्म स्वीकारून मुसलमान पद्धतीने निकाह करावा लागेल’, असा आग्रह धरला. २ वर्षे महिलेसमवेत राहून एका कागदावर तिच्याकडून तलाक दिल्याचे लिहून घेतले. सिराज कुरेशी हा विवाहित असून त्याला ४ मुले आहेत.