Home स्टोरी भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये ५० पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले.

भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये ५० पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले.

129

९ मे वार्ता: पाकिस्तानने काल रात्री अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोटमध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये ५० पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले. पाकिस्तान ने जम्मूमधील अनेक शहरांना लक्ष्य करून गुरुवारी रात्री डागलेल्या क्षेपणास्त्रांना  रोखण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले आहे. बुधवारी उशिरा संध्याकाळपासून जम्मूमध्ये संपूर्ण काळोख होता, नागरिकांनी आकाशात क्षेपणास्त्रांच्या रेषा पाहिल्याची माहिती मिळत आहे.

या सर्व घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अमृतसर, लुधियाना, भुंटर, किशनगड, पटियाला, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, शिमला, कांगडा-गग्गल, भटिंडा, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, हलवारा, पठाणकोट, जम्मू, लेह, मुंद्रा, जामनगर, हिरासर (राजकोट), पोरबंदर, केशोड, कांडला आणि भुज ही विमानतळे पुढील सूचना मिळेपर्यंत नागरी प्रवासासाठी बंद राहणार आहेत.