Home स्टोरी भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हाध्यक्ष मसुरे सुपुत्र नंदू दादा परब यांचा मसुरे...

भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हाध्यक्ष मसुरे सुपुत्र नंदू दादा परब यांचा मसुरे गावच्या वतीने आज मसुरे येथे नागरी सत्कार..!

106

मसुरे प्रतिनिधी: मसुरे गावचे सुपुत्र श्री नंदू दादा परब यांची भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज तमाम मसुरे गावाच्या वतीने सोमवार दिनांक मसुरे आर पी बागवे हायस्कूलच्या सभागृहामध्ये रात्री नऊ वाजता तमाम मसुरे गावाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

यानिमित्त  रात्री ठीक सात वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. श्री लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री  समीर कदम (पोखरण कुडाळ ) पखवाज ओमकार दुखंडे, तबला भावेश लाड विरुद्ध श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी( देवगड) सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री संतोष दत्ताराम जोईल, गुरुवर्य श्री श्रीधर बुवा मुणगेकर यांचे शिष्य..पखवाज. अक्षय मेस्त्री, तबला. मांगरीश घाडी यांच्यामध्ये होणार आहे. डबलबारी भजनाचा आस्वादही घेण्याचे आवाहन समस्त मसुरे ग्रामस्थांनी केले आहे.