Home Uncategorized भाजपकडून युतीचा प्रस्‍ताव; मात्र अद्याप निर्णय नाही ! – राज ठाकरे, अध्‍यक्ष,...

भाजपकडून युतीचा प्रस्‍ताव; मात्र अद्याप निर्णय नाही ! – राज ठाकरे, अध्‍यक्ष, मनसे

139

१६ ऑगस्ट वार्ता: भाजपने आपल्‍यापुढे युतीचा प्रस्‍ताव ठेवला आहे; पण भाजपसमवेत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्‍यामुळे भाजपच्‍या प्रस्‍तावावर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा गौप्‍यस्‍फोट मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी केला. १४ ऑगस्‍ट या दिवशी राज ठाकरे यांनी वांद्रे येथे मनसेच्‍या पदाधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत त्‍यांनी वरील विधान केले. भाजपच्‍या प्रस्‍तावावर मी कोणत्‍याही अंतिम निर्णयापर्यंत पोचलेलो नाही. *नरेंद्र मोदी, अमित शहा, शरद पवार आणि अजित पवार यांच्‍या सहमतीनेच राज्‍यातील घडामोडी घडत आहेत*. अजित पवार भाजपसमवेत जाण्‍यास शरद पवार यांची सहमती आहे. शरद पवार बोलत नाहीत; पण सहमती असल्‍याविना अजित पवार एवढे मोठे पाऊल उचलणार नाहीत. लोकसभेच्‍या निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर मनसेच्‍या १२ पदाधिकार्‍यांचे पथक प्रत्‍येक मतदारसंघात जाईल. याद्वारे जनतेच्‍या मतांचा कानोसा घेण्‍यात येईल. त्‍याचा अहवाल पक्षाला देण्‍यात येईल, असे राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.