वेंगुर्ला प्रतिनिधी: भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सदस्यपदी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचे ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेऊनच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नारायण कुंभार यांची भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सदस्यपदी निवड केली आहे. भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नारायण कुंभार यांचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे. यापूर्वी नारायण कुंभार यांनी भाजप युवा मोर्चा वेंगुर्ला च्या सरचिटणीस पदावर काम केले आहे.
भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सदस्यपदी निवड झाल्यानंतर नारायण कुंभार म्हणाले की, “भाजपा ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सदस्यपदी माझी निवड करण्यात आली. पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावीन. तसेच पक्षाने आखून दिलेल्या ध्येयधोरणांप्रमाणे तळागाळाच्या कार्यकर्त्यापासून ते नागरिकांपर्यत पोहचत पक्ष बळकटीसाठी व राष्ट्रीय विचारधारेसाठी , हिंदूत्वासाठी सदैव तत्पर राहणार आहे.”