अध्यक्ष प्रकाश परब यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन…..
मसुरे प्रतिनिधी
माता काशीबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडियम स्कुल मसुरे येथे शिक्षक दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी शिष्यवृत्ती प्राप्त कु. धृती केशव भोगले,मानस वासुदेव धारगळकर, श्रीया श्रीराम परब, तसेच मंथन परिक्षेमधील प्राविण्य प्राप्त अनया मुळ्ये, अंतरा अभिजित वाडकर तसेच जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळविलेल्या वरद सतीश वाळके या सर्व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष प्रकाश परब,शाळा समिती अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर,मुख्याध्यापक किशोर देऊलकर , संस्था सचिव अशोक मसुरेकर, सरपंच संदीप हडकर,सन्मेष मसुरेकर, संतोष सावंत, राजन परब, श्रीराम परब तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते.