Home शिक्षण भरतगड इंग्लिश मिडियमचा अथर्व कुशे शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत!

भरतगड इंग्लिश मिडियमचा अथर्व कुशे शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत!

266

मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथील माता काशीबाई मेमोरियल ट्रस्ट मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरेचा विद्यार्थी अथर्व अमित कुशे याने इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण मध्ये जिल्हास्तरीय २६ वा तर तालुकास्तरीय ४ था क्रमांक प्राप्त करून उज्ज्वल असे यश संपादन केले आहे. त्याच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रकाश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सचिव अशोक मसुरेकर, खजिनदार अनिरुद्ध मेहेंदळे, संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्वांनी अभिनंदन केले आहे.