Home शिक्षण बॅ नाथ पै सेवांगणचे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गातील १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत!

बॅ नाथ पै सेवांगणचे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गातील १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत!

228

मसुरे प्रतिनिधी: बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या वतीने मालवण व कट्टा येथे मोफत शिष्यवृती वर्ग व NMMS वर्ग चालवला जातो. या वर्गातील १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.vमालवण केंद्र ८वी एनएमएमएस मधून एकता धर्मानंद तांडेल, विघ्नेश सुनील मेस्त्री, पायल हरिश्चंद्र पेंडूरकर, प्रथमेश प्रमोद चव्हाण. कट्टा केंद्र ८ वी नम्मस पलक महाभोज,ओंकार रोहिलकर,कार्तिक पाताडे, मयुर चव्हाण, वैष्णवी गोळवणकर.५ वी शिष्यवृत्ती मधून मधुर पेंडूरकर, गिरीजा नाईक, ८वी शिष्यवृती मधून पलक महाभोज यानी यश प्राप्त केले आहे.

मालवण येथे गेली ३ वर्षे हा वर्ग सुरू असून कट्टा शाखेत गेली २५ वर्ष वर्ग सुरु आहेत. आजपर्यंत दोन्ही शाखेत मिळून १९० पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. या सर्वांचे सेवांगणच्या वतीने अध्यक्ष देवदत परूळेकर,कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, शिष्यवृती विभाग प्रमुख ज्योती तोरसकर, दीपक भोगटे, मार्गदर्शक मनाली वेंगुर्लेकर, मनोज काळसेकर यानी अभिनंदन केले आहे.