Home स्टोरी बीळवस ग्रामपंचायत चे नेहमी आदर्श उपक्रम! सूर्यकांत पालव….

बीळवस ग्रामपंचायत चे नेहमी आदर्श उपक्रम! सूर्यकांत पालव….

325

स्नेहलता भोगले आणि राजश्री पालव अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित..

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): बिळवस ग्रामपंचायत चे नेहमी आदर्श उपक्रम असतात. येथील कर्तबगार दोन महिलांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करून या ग्रामपंचायत ने समाजाभिमुख काम केले आहे. यासाठी बिळवस ग्रामपंचायत आणि अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त महिलांचे मनापासून अभिनंदन. यापुढेही असेच आदर्श उपक्रम हाती घ्यावेत असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श शिक्षक सूर्यकांत पालव यांनी बिळवस येथे बोलताना केले.बिळवस ग्रामपंचायत च्या वतीने गावातील दोन कर्तबगार महिला माजी पंचायत समिती सदस्य समाजसेविका राजश्री पालव तसेच मसुरे गावच्या माजी सरपंच समाजसेविका स्नेहलता भोगले यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन या दोघींना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना बीळवस सरपंच मानसी पालव म्हणाल्यात ग्रामपंचायत च्या वतीने गावात नेहमी विविध समाजाभिमुख उपक्रम हाती घेतले जात असून विकासात्मक कामातही ग्रामपंचायत नेहमी पुढे आहे. या ग्रामपंचायत च्या वतीने सर्व ग्रामस्थांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वेळी अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त दोन्ही महिलांना त्यांच्या पुढील वाटचालीस ग्रामपंचायतीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देते. यावेळी ग्रामसेवक युगल प्रभू गावकर, सरपंच मानसी पालव, आदर्श शिक्षक सूर्यकांत पालव, ग्रा प सदस्य संतोष पालव, रंजना पालव, प्रकाश फणसे, उर्मिला पालव श्रीमती पालव, अमृता पालव, रोहन पालव, सुरेश भोगले, उत्तम भोगले, समिधा आंगणे, उज्वला सावंत, रीया पालव आणि बिलवस ग्रामपंचायत सदस्य, बचत गटांच्या महिला, आणि बिळवस ग्रामस्थ,महीला भगिनी उपस्थित होते. क्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक युगल प्रभू गावकर यांनी व आभार प्रकाश फणसे यांनी मानले सर्व मान्यवरांचे स्वागत सरपंच मानसी पालव यांनी केले.

फोटो! अहिल्याबाई होळकर पुरस्काराने स्नेहलता भोगले यांना गौरविताना बिळवस सरपंच मानसी पालव सोबत सूर्यकांत पालव, युगल प्रभू गावकर आणि मान्यवर.

छाया! शैलेश मसुरकर