Home क्राईम बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली सुरू होता अवैध वेश्याव्यवसाय!

बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली सुरू होता अवैध वेश्याव्यवसाय!

234

८ जुलै वार्ता: बीडमधून ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली आहे.आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह टीमने या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाकर शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील उमरी गावात कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. तक्रार दाखल होताच आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह सपोनि सुरेखा धस यांच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला. यावेळी डीजेच्या तालावर रात्री 2 वाजता काही महिला, मुली नाचत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर या ठिकाणी दारू, गुटखा, वापरलेले कंडोम देखील आढळून आले आहेत. पोलिसांनी येथील महिला, मुलींचा जबाब घेतला असता त्यामध्ये १२ वर्ष ९ महिन्याची असणाऱ्या अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचं उघडकीस आलं.या केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या १ पीडित अल्पवयीन मुलीसह पाच अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर याप्रकरणी उबाठा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदेंसह ३६ जणांवर बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.