बिळवस: बिळवस येथे ११ के. बी. चा करंट लागून शेतकऱ्याचे तीन बैल जागीच ठार जाल्याची दुःखद घटना घडली आहे. दररोज प्रमाणे शेतकरी चंदू पाताडे आपल्या बैलांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्या ठिकाणी पोलावरील ११ kb ची तार कप मधून बाजूला सरकून लोखंडी पोलाला लागली होती. त्यामुळे पोलातून खालील पाण्यात विजेचा करंट वाहत होता. नेमके त्याच ठिकाणी तीन बैल गेल्याने विजेच्या करंट मुळे तीन बैल जागीच ठार झाले. त्या बैलांच्या मागून स्वतः शेतकरी चंदू पाताडे असल्याने त्यांना सुद्धा सौम्य करंट लागला आहे. सुदैवाने शेतकरी शेतकरी चंदू पाताडे बचावले आहेत. याबाबत योग्य ती चौकशी करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तात्काळ भरून द्यावे अशी मागणी शेतकरी चंदू पाताडे यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राहुल सावंत यांनी केली आहे.