Home स्टोरी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती मच्छिमरांनी समुद्रात जावू नये! निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती मच्छिमरांनी समुद्रात जावू नये! निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे.

167

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्राम ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 7 ते 9 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

जिल्ह्यात दि. 7 ते 8 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून दि.9 व 10 जून रोजी गडगडाट होवून पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.तसेच दि. 7 जून रोजी रात्री 11.30 पर्यंत वेंगुर्ला ते वास्को या समुद्र किनारी 2.3 ते 3.2 मीटर च्या लाटा उसळणार आहेत अशी माहिती हैद्राबाद या संस्थेकडून प्रसारित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे.*या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये . तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जावू नये. समुद्राच्या ठिकाणी सेल्फी काढू नये. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष 02362-228847 किंवा टोल फ्री 1077 ला संपर्क करावा. तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी 02363 256518, सावंतवाडी तालुक्यासाठी 02363 272028, वेंगुर्ला तालुक्यासाठी 02366 262053, कुडाळ तालुक्यासाठी 02362 222525, मालवण तालुक्यासाठी 02365 252045, कणकवली तालुक्यासाठी 02367 232025, देवगड तालुक्यासाठी 02364 262204 , वैभववाडी तालुक्यासाठी 02367 237239 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.*हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdumbai.gov.in या संकेस्थळावरुन घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्राकडून घ्यावी, किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 02362 228847 किंवा टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.*