Home स्टोरी बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता.

बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता.

305

७ जून वार्ता: हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील २४ तासांत चक्रीवादळ बिपरजॉय तीव्र होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यासह दक्षिण-पश्चिम भारतातील किनारी राज्यांना खराब हवामानाचा सामना करावा लागणार आहे. पूर्व-मध्य आणि आग्नेय अरबी समुद्रावर शेवटचे रेकॉर्ड केलेले चक्रीवादळ ‘बिपरजॉय‘ पुढील २४ तासांत उत्तरेकडे सरकण्याची आणि चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ गोव्यापासून 890km, मुंबईपासून 1000km.पुढील २४ तासांत जवळपास उत्तरेकडे जाण्याची व अत्यंत SCS मध्ये तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ३ दिवसात NNW सरकेल, असे ट्वीट आयएमडीने केले आहे. IMD ने आज बुधवार दि.७ जून रोजी पहाटे ५:३० वाजता बुलेटीन जारी केले. IMD ने म्हटले आहे की, पुढील तीन ते चार दिवसात वाऱ्याचा वेग ताशी १३५-१४५ किमी राहील. हा वेग १६० किमी प्रतितासापर्यंत वाढू शकतो. अशा परिस्थितीत मच्छिमारांना पुढील चार दिवस समुद्रात न जाण्याचा देखील सल्ला दिला आहे.

७ जून रोजी पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि पश्चिम-मध्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या लगतच्या भागांवर ८०-९० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत, हे वारे ९५-१०५ किमी प्रतितास वेगाने वाढू शकतात आणि त्याच भागात ११५ किमी प्रतितास वेगाने वाहतील. लक्षद्वीप, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम-मध्य आणि दक्षिण अरबी समुद्राच्या लगतचे भाग आणि उत्तर केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीला वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.