Home स्टोरी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, मुळदे येथे गजानन राणे यांच्या हस्ते द्वारफलकाचे...

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, मुळदे येथे गजानन राणे यांच्या हस्ते द्वारफलकाचे उद्घाटन

336

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे (भाई) यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, मुळदे येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२८ मे रोजी द्वारफलकाचे उद्घाटन केले. यावेळी प्रकल्पग्रस्त कामगारांना विश्वास देण्यात आला की, आपण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेत प्रवेश केला आहात. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देईल. तसेच कामगारांना पगारवाढ आणि इतर सुखसोई पूर्वलक्षी प्रमाणे नुकसान भरपाईसह देण्यात येतील. असा विश्वास यावेळी कामगारांना देण्यात आला.