Home स्टोरी बांदिवडेत गोंधळ उत्सव भक्तिपुर्ण वातावरणात संपन्न…!

बांदिवडेत गोंधळ उत्सव भक्तिपुर्ण वातावरणात संपन्न…!

96

मसुरे प्रतिनिधी: उदे…. उदे ….पावणाई देवीचा जयजयकार ! अशा जयघोषात मालवण तालुक्यातील बांदिवडे येथील श्री पावणाई भगवती मंदिर येथे  दुसरा वार्षिक गोंधळ मोठ्या उत्साहात शुक्रवारी संपन्न झाला. सकाळी देवीची विधीवत पुजा झाल्या नंतर सुवर्णलंकार व भरजरी वस्त्रानी देवीला सजविण्यात आले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. माहेरवाशीणीनी ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. रांगेतुन सर्वाना दर्शन मिळावे यासाठी वेळोवेळी सुचना देण्यात येत होत्या.

रात्री दिवटी पुजन व  मांड भरल्या नंतर गोधळ कार्यक्रम झाला. दिवटीस भक्तिने तेल अर्पण करण्यात आले. व त्यानंतर महाप्रसाद सर्वाना देण्यात आला. रात्री उशिरा वाढलेल्या थंडीची तमा न बाळगता हजारो भविकांची गर्दी झाली होती. उत्सवा निमित्त देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळुन गेला होता. मुंबई येथील शाम डेकोरेटर्सचे शाम परब यानी सर्व विद्युत रोषणाई केली होती. बांदिवडे पंचक्रोशीसह विविध ठिकाणाहुन आलेल्या देवीच्या भक्तानी, मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमान्यानी उपस्थिती दर्शविली.

गोंधळ कार्यक्रमास प्रारंभ झाल्या नंतर रात्री नेत्रदिपक फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. देवालय परिसरात हंगामी स्वरुपाची हॉटेल, मिठाई दुकाने, बचत गटांचे स्टॉल, खेळण्यांची दुकाने उभारण्यात आली होती. खेळणी खरेदी करण्यासाठी लहान मुलानी गर्दी केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. देवस्थान मानकरी व ग्रामस्थ, माहेर वाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उत्सव यशस्विते बद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.