Home स्टोरी बंगलादेशच्या किनारपट्टीला मोचा’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

बंगलादेशच्या किनारपट्टीला मोचा’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

79

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: हवामान खात्याने या आठवड्यात चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात ९ मे पर्यंत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी या भागात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चक्रीवादळ मध्य बंगाल उपसागराच्या दिशेने उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. ६ मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. यामुळे आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींवर नजर ठेऊन असल्याची हवामान विभागाने ही महिती दिली आहे. ‘मोचा’ चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला ११ ते १५ मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.