Home स्टोरी प्रेम संबधातून डोक्यावर हातोडी मारुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयितास जामीन मंजुर

प्रेम संबधातून डोक्यावर हातोडी मारुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयितास जामीन मंजुर

148

सिंधुदुर्ग: संशयित आरोपी मनोहर अशोक गवस यासं मे. जिल्हा न्यायालयाने रक्कम रुपये २५०००/- हजार चा जामीन मंजुर करुन आरोपी यांची जामीनावर मुक्तता केलेली आहे. सदरकामी आरोपी यांच्यावतीने अॅड स्वप्नील बबन कोलगांवकर व अॅड. संकेत अभय नेवगी यांनी काम पाहीले.

वस्तुस्थिती अशी की,​ फिर्यादी हिने आरोपी मनोहर अशोक गवस विरुध्द २ मे २०२३ रोजी आरोपी याने १ मे २०२३ रोजी सायंकाळी ४:१५ वाजता च्या सुमारास फिर्यादी ही त्यांचे माटणे गवळाकडे येथील काजुबागेत काजु गोळा करीत असताना अगोदरपासुनच तेथे येवुन थांबलेला आरोपी याने फिर्यादी हिला “तु माका लग्न करता करता म्हणोन आता मेरेन फसयता तुझो जीवच घेता ” असे म्हणुन फिर्यादी हिला जिवंत मारण्याचे उद्देशाने सोबत आणलेल्या लोखंडी हातोडीने फिर्यादी हिचे डोक्यावर व हातावर मारुन दुखापत केली. तसेच आरोपी याने सोबत आणलेल्या प्लॅस्टीक बॉटलमधील पेट्रोल किंवा रॉकेल सारखा द्रव पदार्थ फिर्यादी हिच्या अंगावर शिंपडुन फिर्यादी हिला लायटरच्या साहाय्याने पेटवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन आरोपी याचेविरुध्द फिर्यादी याचे तक्रारी वरुन दोडामार्ग पोलीस ठाणे येथे गु. र. नं. ६२/२०२३ भा.द.वि कलम ३०७,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरकामी आरोपी यांचे वतीने मे. जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला. होता. सदर जामीन अर्जाच्या सुणावणीच्या दरम्याने आरोपीच्या वतीने युक्तीवाद करताना अॅड. स्वप्नील बबन कोलगांवकर यांनी सदर गुन्हाशी आरोपीचा काहीही संबध नाही व आरोपीला खोटया केसमध्ये अडकविलेले आहे. असे प्रथमदर्शनी दिसुन येते असा युक्तीवाद केला. सदरकामी मे. कोर्टासमोर आलेल्या वस्तुस्थितीवरुन संशयित आरोपी मनोहर अशोक गवस यांची जामीनावर मुक्तता केलेली आहे.