Home स्टोरी प्रायव्हेट फायनांन्स कंपन्या देत असलेल्या त्रासाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी...

प्रायव्हेट फायनांन्स कंपन्या देत असलेल्या त्रासाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन !

209

सिंधुदुर्ग: “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना खाजगी वित्तीय संस्था (प्रायव्हेट फायनांन्स कंपनी) देत असलेल्या त्रासाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस सौ स्नेहल सुधीर जाधव यांनी ओरस येथे माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांना योग्य ते सहकार्य करण्यास सांगितले. त्यावेळी सोबत मनसे मा.जिल्हाध्यक्ष श्री.धीरज परब, श्री.संतोष मयेकर,श्री.बबलू परब,मा.शाखाअध्यक्ष किशोर ठुकरुल, मा.जिल्हासचिव बाळा पावसकर, मा.उपतालुकाअध्यक्ष जगन्नाथ गावडे उपस्थित होते.”