Home स्टोरी पोईपमध्ये भाजपा- ठाकरे शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने…

पोईपमध्ये भाजपा- ठाकरे शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने…

300

होऊ द्या चर्चा कार्यक्रम; वातावरण तणावपूर्ण, पोलीस यंत्रणा सतर्क…

मालवण प्रतिनिधी:

 

भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित “होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील पोईप गावात भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.मात्र पोलीसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

राज्यात अराजकता वाढली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना दिलेली खोटी आश्वासने, चुकीचे शैक्षणिक धोरण यांमुळे जनतेच्या मनात खदखद निर्माण झाली आहे. यासह अन्य विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हिंदुत्वा सारखे मुद्दे समोर आणले जात आहेत. त्यामुळे जनतेमध्ये जागृती करण्यासाठी आणि जनतेच्या मनातील असंतोषाला बाहेर काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी पोईप बाजारपेठ येथे ‘होऊ दे चर्चा’ हा जनतेशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख धोंडी चिंदरकर अशोक सावंत बाबा परब राजू परुळेकर दादा नाईक राकेश सावंत आदी पदाधिकारी दाखल झाले त्यांनी आम्हाला पण या चर्चेत सहभागी व्हायचे आहे, अशी भूमिका घेतली.तसेच आमदार वैभव नाईक यांनी आश्वासने आणि घोषणा केलेली पत्र दाखवून घोषणाबाजी केली. याठिकाणी दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी सुरु झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले झाले असता पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी चोख बंदोबस्त ठेवत संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांना शांत केलं.