Home स्टोरी पोईप ग्रामपंचायत येथे कृषीकन्यांचे स्वागत!

पोईप ग्रामपंचायत येथे कृषीकन्यांचे स्वागत!

146

मसुरे प्रतिनिधी: ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत पोईप गावात दाखल झालेल्या उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील कृषी कन्यांचे सरपंच श्रीधर राघोजी नाईक यांनी स्वागत केले. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत कृषिकन्या गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत. गावात राहून गावाची शेती विषयक कार्यपद्धती, विविध संस्था, शाळा, शेतीवर आधारित विविध उद्योग यांची सविस्तर माहिती घेणार आहेत. विविध शेतकयांच्या शेतावर जाऊन शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करणार आहेत. सदर गटामध्ये कु. प्रणिता बिरादार, कु प्राची मोरे, कु अन्नु पॉल, नेहा भावठाणकर, साक्षी कडव, कु ऋतूजा पाटील. या विद्यार्थिनींचा समावेश आहे.