Home स्टोरी पेडणेकर सेवा ट्रस्ट कडून मोफत वह्या वाटप ! गुणवंतांचा झाला सन्मान

पेडणेकर सेवा ट्रस्ट कडून मोफत वह्या वाटप ! गुणवंतांचा झाला सन्मान

134

मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे कावावाडी येथे श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट (रजि) यांच्या स्मरणार्थ इ. १० वी. – इ. १२ वी व पदवी परिक्षेमध्ये उत्तिर्ण झालेल्या ६० टक्के वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व इतर विद्यार्थ्यांना वह्या वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शरद रावजी पेडणेकर, सचिव मिलिंद जगदिश कांबळी, खजिनदार राजाराम दिनकर खोत, अँड. केदार दयाल जुवेकर, काशीनाथ पांडूरंग पेडणेकर,चंद्रकांत सहदेव पेडणेकर, दिपक वसंत हिंदळेकर,साईप्रसाद श्रीधर पेडणेकर, मधुरा विजय पेडणेकर, रमण चंद्रकांत पेडणेकर, समीर तुळशीदास पडणेकर, विकास पेडणेकर, विजय कांबळी, देवानंद कांबळी, अरुण आंबेरकर गुरुदास शिंगरे, दिनेश पेडणेकर, पियुश पेडणेकर, मनाली पेडणेकर, स्नेहल पेडणेकर, चिंतनी पेडणेकर, निखिल पेडणेकर, दर्शित पेडणेकर, निधी पेडणेकर, बबन पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार शरद पेडणेकर यांनी मानले.