कणकवली: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एस. एम. हायस्कूल, कणकवलीची कु. डेलिशा संदीप सावंत हिने ८४.३५% गुण प्राप्त करत, कणकवली तालुक्यात शहरी सर्वसाधारण विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
तिच्या या देदिप्यमान यशाबद्दल कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीच्या डॉ. धनश्री संदीप सावंत – तायशेटे (अध्यक्षा) डॉ. सूर्यकांत तायशेटे (चेअरमन) श्री. दत्तात्रय नलावडे (सचिव) डॉ. संदीप सावंत (व्हाईस चेअरमन) श्री. मोहन काणेकर (व्हाईस चेअरमन) व संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच मुख्याध्यापक जी. एन्. बोडके (मुख्याध्यापक) संस्थेच्या सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
तिला या यशाबद्दल श्री. सी. जी. गरगटे, श्री. एस्. एम्. पवार, श्री. एस्. एम्. नौकूडकर, श्रीमती. एन्. एन्. तायशेटे या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. कु. डेलिशा सावंत ही कणकवली शहरातील प्रतिथयश डॉ. सूर्यकांत तायशेटे यांची नात आहे.