Home शिक्षण पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिवीका हरमलकर शिष्यवृत्तीची मानकरी

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिवीका हरमलकर शिष्यवृत्तीची मानकरी

176

वेंगुर्ला प्रतिनिधी: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये संपन्न झालेल्या इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पेंडुर तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, पेंढर्‍याची वाडी प्रशालेची विद्यार्थिनी जीविका प्रसाद हरमलकर हिने राज्यस्तरीय ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त केली. त्याबद्दल तिचे, तिच्या पालकांचे व मार्गदर्शक वर्गशिक्षक समीर तेंडुलकर, इतर शिक्षक व मुख्याध्यापक यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा गौरी फटनाईक व सर्व सदस्य, पालक- शिक्षक संघ, माता पालक संघ, पेंडूरचे सरपंच संतोष गावडे , लवू चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.