Home स्टोरी पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ‘अहिल्या भीम पर्व’ कार्यक्रमाचे...

पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ‘अहिल्या भीम पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन.

219

मसुरे प्रतिनिधी: समृद्धी पब्लिकेशन, सिंधुदुर्ग आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ३०० व्या जयंतीनिमित्त अहिल्या भीम पर्व कला, सामाजिक, साहित्य, संमेलन, सिंधुदुर्गनगरी येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुस्तके प्रकाशन गझल सादरीकरण व विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा व संस्थांचा कौतुक सन्मान सोहळा रविवार दि. १ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्थळ – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन जिल्हा बँक समोर ओरोस, मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे

अहिल्याबाई होळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुप्रसिद्ध सिने अभिनेते सुनील गोडबोले, गोवा येथील माजी केंद्रीय कायदामंत्री एडवोकेट रमाकांत खलप, पुण्याचे सुप्रसिद्ध उद्योजक बी.के.जी चे संचालक डॉ. दत्तात्रय करपे, पुणे येथील दिग्दर्शक, निर्माता, लेखक श्री.संदीप राक्षे, पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री.एन. जी. खरात, पंचशील ट्रस्टचे, अध्यक्ष – संजय खोटलेकर, गोवा येथील सुप्रसिद्ध गीतकार व गझलकार अजय नाईक, महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री दशरथ शिंगारे, भटक्या विमुक्त जमाती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. यशवंतराव शेळके, आयपीएस उत्तीर्ण बिरदेव डोणे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी

अहिल्या भीम पर्व सन्मान कौतुक सोहळ्याचे आयोजन व पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संगीतकार अजय नाईक यांच्या बहारदार आवाजातून गझल सादरीकरणाचा कार्यक्रम होणार तसेच सिंधुदुर्गातील दशावतार फुगडी गीत व गजानृत्य अशा लोककलांचे दर्शन या कार्यक्रमातून होणार आहे.महाराष्ट्रातील नामवंत समाजसेवक, उद्योजक, कलाकार तसेच कवी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न होणार आहे. त्यासाठी सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन समृद्धी पब्लिकेशनचे संचालक प्रा. डॉ. बी एन खरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.