Home क्राईम पी.एफ्.आय.च्या ५५ समर्थकांना अटक! उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून धाडी! समाजवादी पक्षाचा...

पी.एफ्.आय.च्या ५५ समर्थकांना अटक! उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून धाडी! समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक याला अटक….

101

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील ३० जिल्ह्यांत घातलेल्या धाडीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटनेच्या ५५ समर्थकांना अटक केली. मेरठ येथे समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक अंसारी यालाही अटक करण्यात आली आहे. तो बुलंदशहरचा अध्यक्ष आहे.

१. आतंकवादविरोधी पथकाने लक्ष्मणपुरी, मेरठ, मुरादाबाद, वाराणसी, आजमगड, सहारनपूर, गाजियाबाद यांसमवेत अन्य शहरांमध्ये धाडी घातल्या.

२. यापूर्वी २४ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ४ राज्यांत अशा धाडी घातल्या होत्या. त्या वेळी पी.एफ्.आय.चे जिहादी नेते आणि कार्यकर्ते यांना अटक केली होती. या जिहाद्यांची चौकशीतून जी नावे पुढे येत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

३. पी.एफ्.आय.च्या प्रमुखांना अटक केल्यानंतर या जिहादी संघटनेतील तळागाळातील नेते आणि कार्यकर्ते गुप्तपणे संघटित होऊन पी.एफ्.आय. संघटना पुन्हा उभी करण्याच्या प्रयत्नात आहे.