मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील बिळवस गावातील धाकूधाम ते बिळवस हायस्कूल या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष येथील ग्रामस्थांची या रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची मागणी पूर्ण झाल्याने बिळवस ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या स्ट्रीट लाईट कामा साठी येथील सरपंच सौ मानसी पालव, ग्रामसेवक युगल प्रभू गावकर तसेच येथील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
मालवण तालुक्यातील बिळवस येथील धाकूधाम ते बिळवस हायस्कूल या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची मागणी गेली अनेक वर्ष येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे, सर्वपक्षीय नेतेमंडळींकडे वारंवार केली होती. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही सर्व स्तरावरती यासाठी नेहमी पाठपुरावा केला जात होता. परंतु या प्रश्नाला अद्याप पर्यंत यश आले नव्हते. याबाबत येथील सरपंच सौ मानसी पालव, ग्रामसेवक युगल प्रभूगावकर आणि सर्व सदस्य यांनी माजी खासदार निलेश राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आंगणेवाडी यात्रोत्सव कालावधीतच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून या रस्त्यावरती स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण करून दिले आहे. रात्र प्रसंगी या रस्त्याला येथील ग्रामस्थांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची सुद्धा ये जा मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्याला स्ट्रीट लाईट नसल्यामुळे येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत होते. रात्रप्रसंगी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रामस्थांची ही समस्या दूर केल्याने बिळवस ग्रामस्थ तसेच बीळवस ग्रामपंचायत यांच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. यावेळी या स्ट्रीट लाईटचा शुभारंभ बिळवस सरपंच सौ मानसी पालव यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक युगल प्रभू गावकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव, प्रकाश फणसे, रंजना पालव, मोहन पालव, राहुल सावंत, गोविंद सावंत श्रीधर पालव, रामचंद्र पालव, शार्दुल पालव, पप्पू पालव, आबा पालव तसेच येथील ग्रामस्थ आणि सदस्य उपस्थित होते.