मुंबई: वर्ष २०२२ मधील गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये वाजवल्याच्या प्रकरणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी याविषयी असंतोष व्यक्त करत हे गुन्हे मागे घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत ‘गणेशोत्सवाच्या कालावधीत पारंपरिक वाद्ये वाजवल्याच्या प्रकरणी नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत’, अशी मागणी सर्व मंडळांनी एकत्रितपणे केली. बैठकीत ‘अखिल सार्वजनिक उत्सव समिती’चे अध्यक्ष हितेंद्र जाधव यांनी गणेशोत्सव मंडळांच्या विविध मागण्यांचे निवेदन सरकारला सादर केले. श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत अनेक मंडळे एकत्र असतात. मंडळांच्या वाद्यांच्या आवाजाने एकत्रित मोजमाप केले जाते. यामध्ये आजूबाजूच्या गाड्यांचे ‘हॉर्न’ आणि गोंगाट यांचाही समावेश आहे. गणेशोत्सव मंडळे कायद्याचे उल्लंघन करत नाहीत. गणेशोत्सवाच्या कालावधीत एकीकडे सरकार काही दिवस ध्वनीक्षेपकाचे नियम शिथिल करते आणि दुसर्या बाजूला त्याच दिवशीअशा प्रकारचे गुन्हे नोंदवते. ‘आवाज फाऊंडेशन’च्या दबावाला बळी पडून पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे. ‘कारवाई करतांना तारतम्य बाळगायला हवे’,