Home शिक्षण परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने २९ जुलै रोजी सावंतवाडीत ओपन सेमिनार….

परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने २९ जुलै रोजी सावंतवाडीत ओपन सेमिनार….

105

सावंतवाडी: परफेक्ट अकॅडेमी, सिंधुदुर्ग व मिलाग्रीस हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने FOUNDATION COURSE–NEET, JEE, CET यांच्या तयारीकरीता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 29 जुलै रोजी सावंतवाडी येथे करण्यात आले आहे.

इयत्ता ६ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने मिलाग्रीस हायस्कूल येथे सकाळी १० वाजता तसेच आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी येथे दुपारी बारा वाजता ओपन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. तरी सावंतवाडी शहरातील विविध प्रशालेतील विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गांनी येत्या २९ जुलै २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता मिलाग्रीस प्रशालेच्या हॉलमध्ये व दुपारी १२ वाजता आरपीडी प्रशालेच्या हॉलमध्ये उपस्थित राहून अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या NEET, JEE, MH – CET या परीक्षेची इयत्ता सहावीपासून कशी तयारी करावी ?, तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी बालवयापासूनच कशी करावी? या संदर्भात परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिलाग्रीस प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा आणि आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी केले आहे.

या सेमिनारमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला अमूल्य मार्गदर्शन करणार आहेत. तरी तमाम पालक, शिक्षक व विद्यार्थी यांना सूचित करण्यात येते की, दिनांक २९ जुलै २०२३ रोजी सदर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.