सावंतवाडी प्रतिनिधी: संस्थानकालीन सुंदरवाडी असलेल्या सावंतवाडीत दर्जेदार असे कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन झाले खरे या साहित्य संमेलनाला मला यायचेच होते. पण प्रकृती ने साथ दिली नसल्याने या संमेलनाला मला उपस्थित राहता आले नाही. याचे खरच वाईट वाटते. माझ्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासातील हे साहित्य संमेलन माझ्या दृष्टीने उपस्थित राहणे फार महत्त्वाचे होते. जिल्हा शाखा व सावंतवाडी शाखा यांनी हे साहित्य संमेलन उत्कृष्ट असे नियोजनबद्ध केले. त्याबद्दल त्याने कौतुक केले. या साहित्य संमेलनातून साहित्य चळवळ अधिक व्यापकतेने पुढे जाईल अशी आशा आहे.अशा शब्दात कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सावंतवाडी येथे २२ मार्चला जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सावंतवाडी शाखेतर्फे जिल्हा शाखेच्या वतीने त्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला ते या समितीला अनुपस्थित राहिल्याने गेल्याच आठवड्यात ते रत्नागिरी येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते त्यावेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार सन्मान जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सौ नमिताकीर कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आधी कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते यावेळी सुरेश पवार एडवोकेट मंदारम्हस्के.. आधी उपस्थित होते यावेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक म्हणाले खरंतर सावंतवाडीत जिल्हास्तरीय साहित्य संमेलन व्हावे. अशी माझी मनापासून इच्छा होती. आणि मी ती बोलूनही दाखवली होती त्यानुसार हे साहित्य संमेलन २२ मार्चला सावंतवाडीत घेण्यात आले या संमेलनाला मला मनापासून यायचे होते मी तशी तयारीही केली होती. परंतु अचानक मला प्रकृतीने चांगली साथ दिली नसल्याने हे संमेलन मला मुकले. या संमेलना मी यायला हवे होते कारण माझ्या आतापर्यंतच्या साहित्य चळवळीतील हे संमेलन माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे संमेलन आणि ते सावंतवाडी होणार असल्याने मी येणारच होतो आणि हे संमेलन कदाचित माझ्या आयुष्यातील ते शेवटचे हे असले असते. त्यामुळे मी या संमेलनात जरूर येणार होतो परंतु मला येता आले नाही. याचे फार वाईट वाटते मात्र या संमेलना त पालकमंत्री नितेश राणे यांनी हजेरी लावून साहित्य चळवळ पुढे नेण्याच्या दृष्टीने जे काही वचन दिले आहे. ते निश्चित पाळतील आणि साहित्य जवळ पुढे नेतील. विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी सावंतवाडी शाखेने उत्तम नियोजन करून हे संमेलन यशस्वी केले. त्याबद्दल त्यांनी तोंड भरून कौतुक केले यावेळी जिल्हा शाखा व सावंतवाडी शाखेचे त्यांनी विशेष कौतुकही केले.