Home स्टोरी पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या बाजूने नव्हते! नृपेंद्र मिश्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या बाजूने नव्हते! नृपेंद्र मिश्रा

110

२१ मे वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या बाजूने नव्हते, परंतु ते त्यांच्या टीमच्या सल्ल्यानुसार गेले’, असा गौप्यस्फोट पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी केला आहे. मिश्रा यांनी 2016 मध्ये नोटाबंदीचे निरीक्षण केले होते. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यूज 18 शी केलेल्या विशेष संभाषणात, त्यांनी स्पष्ट केले की या नोटा काढण्याचा निर्णय नोटाबंदी अजिबात नाही. नृपेंद्र मिश्रा यांनी न्यूज18 ला सांगितले की, ‘ही नोटाबंदी नाही तर 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेणे आहे.

नोटाबंदीच्या वेळी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याची सूचना करण्यात आली होती, जी पंतप्रधानांना आवडली नाही. मात्र, कर्णधार म्हणून आपल्या टीमच्या सल्ल्याने त्यांनी या नोटांना परवानगी दिली. तेव्हा ते अगदी स्पष्ट होते आणि आम्हीही होतो की ही एक अल्पकालीन व्यवस्था असेल.’ ‘गरीबांना याचा त्रास होऊ नये’ यासोबतच ते म्हणाले, ‘गरीब आणि मध्यमवर्गीय लोक 2000 रुपयांच्या नोटा वापरत नाहीत, ते 500 आणि 100 रुपयांच्या छोट्या नोटा वापरतात आणि पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, गरीबांना याचा फटका बसू नये अशी त्यांची इच्छा आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा जाहीर करण्यात आलेल्या घोषणेमध्ये आरबीआयने या नोटा परत घेण्याची घोषणा केली. RBI ने याला ‘क्लीन नोट’ पॉलिसीचा एक भाग म्हणून संबोधले, याचा अर्थ उच्च मूल्याच्या नोटांचे शेल्फ लाइफ चार-पाच वर्षे कमी असते. त्यामुळे या नोटा टप्प्याटप्प्याने बाद होणे अपरिहार्य होते.

काळजी करण्याचे काही कारण आहे का? असा प्रश्न विचारला असता या प्रश्नावर नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, ‘अजिबात नाही. ज्यांच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा आहेत ते त्यांच्या बँकेत जाऊन पैसे जमा करू शकतात किंवा बदलूनही घेऊ शकतात. त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. काळ्या पैशाला आळा घालणे हाही या नोटा मागे घेण्यामागचा उद्देश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ज्यांच्याकडे काळा पैसा आहे ते मोठ्या नोटांमध्ये ठेवतात.आणि हे जास्त काळ प्रचलित न राहण्याचे एक कारण आहे. दरम्यान, विरोधकांचे म्हणणे आहे की 2016 च्या नोटाबंदीमुळे काळा पैसा थांबला नाही आणि फक्त गरिबांना त्रास झाला. सरकारकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहे. 500 आणि 100 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.