Home स्टोरी न्हावेली गावासाठी कायमस्वरूपी वायरमन द्या. 

न्हावेली गावासाठी कायमस्वरूपी वायरमन द्या. 

90

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राउळ यांच्या नेतृत्वखाली मनसे विभाग अध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य न्हावेली अक्षय पार्सेकर यांनी घेतली सावंतवाडी उपअभियंत्यांची भेट.

सावंतवाडी प्रतिनिधी: न्हावेली गावात वारंवार वीज खंडित होत असून त्याचा त्रास न्हावेली गावातील ग्रामस्थांना सोसावा लागत आहे , असा एकही दिवस नाही जात की वीज जात नाही..दिवस भर लाईट नसते रात्री आली तर पुन्हा थोड्या वेळाने वीज जाते ती दुसऱ्या दिवशी रात्री पर्यंत विजेची बत्ती गुल असते त्याचा त्रास विद्यार्थ्यांचा अभ्यासावरही होतो तसेच लाइट नसल्याने पाणी पुरवठा खंडीत होतो .विजेच्या तारा रात्री अपरात्री तुटून पडतात यामुळे जिवीत हानी सुद्धा होऊ शकते. गुरुवारी रात्री असा प्रकार घडून आला त्यात सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मध्य रात्री विजेच्या तारा रस्त्यावर तुटून पडल्या होत्या. गावात स्वत्रंत वायरमन नसल्यामुळे शाखा अभियता लोहार यांना कळविले असता दीड तासानंतर ती हटविण्यात आली. वायरमन नसल्यामुळे गावात नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे गावासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी वायरमन देणे ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य न्हावेली यांनी मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या नेतृत्वात सावंतवाडी उपअभियंता चव्हाण आणि शाखा अभियंता लोहार यांच्या कडे.निवेदना व्दारे केली आहे. त्यानंतर आपण लवकरच न्हावेली गावासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी वायरमन देऊ हे आश्र्वासन उपअभियंता चव्हाण यांनी दिले. त्यावेळीं सोबत तुकाराम पार्सेकर आणि नवनाथ पार्सेकर उपस्थीत होते.