सावंतवाडी: तालुक्यातील नेमळे येथे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम आयोजित केला होता . या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणुन फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील डॉ. गोपाळ गोळवणकर, डॉ. प्रमोद तल्हा हे उपस्थित होते.
यावेळी आंबा पिक संरक्षण, किटकनाशकांची हाताळणी सेंद्रिय जैविक पध्दतीने किड रोग नियंत्रण चिकट सापळ्यांचा वापर खोडकिडा नियंत्रण इत्यादीबाबत उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सिंधुरत्न योजनेतुन रक्षक सापळ्यांचा लाभ घेउन सामुहीकपणे फळमाशी नियंत्रण करण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन नेमळे कृषी सहाय्यक निरवडेकर मॅडम यानी केले. यावेळी नेमळे येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.