Home स्टोरी निष्कासन कारवाईचा खर्च वसूल करण्यात प्रभाग ४ जे कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त असमर्थ?

निष्कासन कारवाईचा खर्च वसूल करण्यात प्रभाग ४ जे कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त असमर्थ?

48

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): प्रभाग ४ जे अंतर्गत एका ढाब्यावर जानेवारी – २०२२ मध्ये निष्कासन कारवाई करण्यात येऊन झालेल्या खर्चाचे देयक संबंधीतांना देण्यात आले. परंतु या कारवाईसाठी झालेला एकूण खर्च ३२२०० / – रुपये ( रुपये बत्तीस हजार दोनशे ) निष्कासन कारवाई नंतर १ वर्ष ४ महिने झाले तरी वसूल करण्यात आला नाही ! _प्रभाग ४ जे मधील भोंगळ कारभाराचा प्रकार माहितीच्या अधिकारात उघड !_ आयुक्त महोदय; महापालिकेच्या या आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण? संबंधीतांवर काय कारवाई करणार?