Home स्टोरी निवती बंदर येथे ३ मार्च रोजी खुल्या रेकाॅर्ड डान्स स्पर्धा! विठ्ठल रखुमाई...

निवती बंदर येथे ३ मार्च रोजी खुल्या रेकाॅर्ड डान्स स्पर्धा! विठ्ठल रखुमाई मंदिराच्या २३ व्या वर्धापनदिना निमित्त आयोजन.

115

मसूरे प्रतिनिधी: निवती मेढा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त ३ मार्च रोजी रात्रौ‌ ९ वा. खुल्या रेकाॅर्ड डान्स स्पर्धा आयोजित केल्या आहेत.या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे १०,०००/-(सतीश आचरेकर,मालवण पुरस्कृत), ७०००/-(निळकंठ शंकर मेतर पुरस्कृत)व ३०००/-रु.(मिताली व भावार्थ नरसिंह भगत पुरस्कृत)उत्तेजनार्थ प्रथम १०००/-(ज्ञानदा व सार्थक नंदकिशोर भगत पुरस्कृत) द्वितीय १०००/-रु.(लावली व निलेश कैलास मेतर पुरस्कृत) अशी पारितोषिके ठेववण्यात आली आहेत.या स्पर्धेसाठी कायम स्वरुपी चषक निलेश मनोज सावंत यांनी पुरस्कृत xकेले आहेत.या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन विठ्ठल रखुमाई मंदिर समितीने केले आहे.

स्पर्धा सहभाग साठी मिनार परब- ७५८८९४९९६१, निलेश सावंत ९४०३२९५०६६, जानू धुरी- ९४२२९४८३५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.