Home राजकारण नितेश राणेंची प्रियंका गांधी आणि राऊत यांच्यावर जोरदार टीका

नितेश राणेंची प्रियंका गांधी आणि राऊत यांच्यावर जोरदार टीका

101

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत आपल्याला काँग्रेसने ९१ वेळा शिव्या दिल्या. त्यावर ते रडले. त्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी टीका केली. त्यांनी आमच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या शिव्यांची यादी काढली, तर एकापाठोपाठ एक पुस्तकांचं प्रकाशन करावं लागेल. मी असे पहिले पंतप्रधान पाहिलेत की, जे लोकांसमोर येत रडत सांगतात की त्यांना शिव्या दिल्या जात आहेत. त्यांचा हा भाषणाचा व्हीडिओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर ठेवला आहे. त्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रियंका गांधी आणि राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितेश राणे यांनी प्रियंका गांधी यांना, पंतप्रधान साहेबांचे भाषण कळलं नाही. बौद्धिक पात्रता नाही. तेच पंतप्रधान यांच्या भाषणाचे असे उत्तर देऊ शकतात.असे म्हटलं आहे. तर नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांचा कार्ट असा उल्लेख केला आहे.