Home राजकारण नारायण राणे यांच्या विजयासाठी मसूरेत ग्रामदैवत भरतेश्वराचरणी साकडे..!

नारायण राणे यांच्या विजयासाठी मसूरेत ग्रामदैवत भरतेश्वराचरणी साकडे..!

274

मसुरे प्रतिनिधी: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी मसुरे गावातील भाजप आणि युतीमधील पक्षातील कार्यकर्त्यांनी मसरे गावचे ग्रामदैवत श्री देव भरतेश्वरचरणी प्रार्थना करून विजयाचे साकडे घातले. यावेळी मसुरे देवस्थान प्रमुख श्री बाबुराव प्रभू गावकर यांनी श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी मसुरे प्रभागात प्रत्येक बूथ वरती प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभूगावकर, माजी जी प अध्यक्ष सरोज परब, शिवाजी परब,माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, माजी ग्रामपंचायत सदस्य विलास मेस्त्री, सिद्धेश मसुरकर,सुरेश घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटकर, हरी ठाकूर आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांना या भागातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.