Home स्टोरी नागपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

नागपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

71

नागपूरमध्ये घराला लागलेल्या आगीमध्ये गुदमरुन दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली असून सध्या इमामवाडा पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये शॉट सर्किटमुळे घराला आग लागली. आगी लागल्यानंतर निघालेल्या धुरात गुदमरून दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूरच्या इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याठिकाणी असलेल्या आनंद पब्लिक स्कूलच्या बाजूला असलेल्या खोलीला आग लागली. त्यामध्ये राहत असलेल्या आकाश रजक आणि अमन तिवारी या दोघांचा मृत्यू झाला. आकाश आणि अमन हे दोघेही मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. ते गेल्या काही महिन्यांपासून नागपूरमध्ये राहत होते. याठिकाणी ते फ्लेक्सची कामं करायचे. रविवारी त्यांच्या घरामध्ये असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाला. त्यानंतर घराला आग लागून धुराचे साम्राज्य झाले. यामध्ये गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. आकाश आणि अमनचे परिचित त्यांना भेटण्यासाठी घरी आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.