Home राजकारण नंदकिशोर परब यांची कल्याण – २४ लोकसभा प्रभारी या पदावर निवड…!

नंदकिशोर परब यांची कल्याण – २४ लोकसभा प्रभारी या पदावर निवड…!

169

मसुरे प्रतिनिधी: मसुरे गावचे सुपुत्र आणि डोंबिवली येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व श्री नंदकिशोर उर्फ नंदू दादा परब यांची कल्याण – २४ लोकसभा प्रभारी या पदावर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नुकतीच निवड करण्यात आली आहे. या पूर्वी ते कल्याण जिल्हा सरचिटणीस व १४४ – कल्याण विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या पदावर काम करत आहेत. नंदू परब यांचा अनेक निवडणुकांचा गाढा अभ्यास आहे.

भारतीय जनता पक्षाची मूलभूत तत्वे आणि पक्ष वाढीसाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली कल्याण या भागामध्ये नंदू परब यांचे मोठे योगदान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांमध्ये सुद्धा त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.